Thursday, August 11, 2022

शिर्कि येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले

- Advertisement -

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

पेण तालुक्यातील शिर्कि चाळ नंबर 2 येथील सागरवाडीत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. पहाटे एकविरा दर्शनासाठी निघालेले यशवंत पाटील, सुमन पाटील व भूषण पाटील यांचे सामूहिक मालकीचे संपूर्ण घर शॉर्ट सर्किटमुळे जळाले.

- Advertisement -

- Advertisement -

सदर कुटुंबातील सर्व व्यक्ती कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनाला घडलेल्या घटनेच्या दिवशी पहाटे 5.30 च्या दरम्यान निघाले होते. घरातून निघताना सर्व उपकरणे बंद केली होती. मात्र लाकडाचे जुने घर असल्याने व उंदीर त्रास देत असल्याने घरातील एकच बल्ब सुरू ठेवला होता. पण याच बल्बने घात करत शॉर्ट सर्किट मुळे सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान घराला भीषण आग लागून काही क्षणातच संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. आणि यशवंत मारुती पाटील, सुमन मधुकर पाटील व भूषण मधुकर पाटील यांच्या सामूहिक मालकीचा शिर्कि चाळ नंबर 2 वरील सागरवाडी येथील घर जळून खाक झाले.

या आगीत घरातील सर्व फर्निचर, संपूर्ण विद्युत फिटिंग, टीव्ही, फ्रीज, फॅन आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू, शासकीय सर्व कागदपत्रे व अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. सदर आगीची बातमी परिसरात वाऱ्या सारखी पसरताच सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, वडखळ पोलीस आदींनी तात्काळ भेट दिली. तर पोलीस व महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने सीएसआर फंडातून सदर कुटुंबाला मदत करावी अशी मागणी सागरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या