Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
    अपघात

    अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

    21 दिवसांनंतर गुन्हा दाखल : अपघातानंतर चालक पसार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 6, 2026No Comments141 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जामनेर-पाचोरा मार्गावरील के.के. कॉटेक्स कंपनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अपघातानंतर तब्बल 21 दिवसांनी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मुन्शी काकरे (वय 28, रा. सुहागी सुदरदेव, ता. खलवा, जि. खंडवा, मध्यप्रदेश) हे पाचोरा येथील के.के. कॉटेक्स कंपनीत काम करत होते. दि. 13 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 8:50 वाजता ते जामनेर शहराकडून कंपनीकडे पायी जात असताना प्रमोद कोठारी यांच्या गोदामासमोरील जामनेर-पाचोरा महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात संतोष काकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने जखमीला कोणतीही मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मृताच्या वडिलांनी मुन्शी सज्जुलाल काकरे (वय 45) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश कितीकर करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif