यावल शहर

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे काल दि. ११/०७/२०२६ शनिवार रोजी इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पालक-शिक्षक सभेचे अध्यक्ष तसेच प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डी. बी. मोरे, तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक, संजय गोसावी, एस. एन. चौधरी व एस. एस. पाटील, राकेश अडकमोल यांनी उपस्थित मान्यवर पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल, इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ कशी करता येईल, अभ्यासात सातत्य कसे ठेवावे, पालक-शिक्षक समन्वय कसा वाढवावा तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भातील विविध प्रश्न, सूचना व मते मांडली. उपस्थित शिक्षकांनी सर्व प्रश्न संयमाने ऐकून त्यांचे समाधानकारक योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर इयत्ता ५ वी ते १२ वी पालक समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या उपाध्यक्षपदी पवन भालेराव बोराळे यांची निवड करण्यात आली.
या वेळेस राजू वानखेडे, किशोर वानखेडे, प्रदीप वानखेडे, फिरोज तडवी, विनोद मराठे, प्रविण धनगर, पवन भालेराव, नितीन राजपूत महारू तडवी तसेच इतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सभेचे अध्यक्ष प्राचार्य डी. बी. मोरे यांनी उपस्थित सर्व पालक, शिक्षक व मान्यवरांचे आभार मानून सभा यशस्वीरीत्या संपन्न झाल्याचे घोषित केले.
विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यालय यांचा सुसंवाद, सहकार्य व सातत्यपूर्ण प्रयत्न हेच यशाचे खरे सूत्र आहे, असे मार्गदर्शन शाळेचे प्राध्यापक डी. बी. मोरे यांनी केले.


