Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»प्रवासी बस त्रिशुली नदीत कोसळली : १८ ठार
    अपघात

    प्रवासी बस त्रिशुली नदीत कोसळली : १८ ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 23, 2026Updated:February 23, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नेपाळमधील काठमांडू येथे भीषण अपघात झाला आहे. धाडिंग जिल्ह्यातील गजुरीजवळ सोमवारी पहाटे एक प्रवासी बस त्रिशुली नदीत कोसळली. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर २८ जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. याप्रकरणी अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्यासुमारास ४४ प्रवाशांना घेऊन पोखराहून काठमांडूकडे येणारी बस पहाटे १.३० वाजता काठमांडूपासून सुमारे ९० किमी पश्चिमेला पृथ्वी महामार्गावर धाडिंगमधील बेनीघाट रोरांग येथे पोहचली. यादरम्यान या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी बाजूलाच असलेल्या त्रिशुली नदीत कोसळली.

    या दुर्घटनेत २६ प्रवासी जखमी झाले असून १८ जणांचा मृतदेह या नदीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्यावेळी या बसमधून एकूण ४४ प्रवासी होते. जखमी झालेल्या २६ प्रवाशांना वाचवण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जखमी प्रवाशांना बोटीने सुमारे एक किलोमीटर अंतरावर आणण्यात आले, तेथून त्यांना रस्त्यावर नेण्यात आले आणि नंतर रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले.

    बचाव कार्यात प्रचंड अडथळा

    रात्रीची वेळ, कठीण भूभाग आणि साहित्याचा अभाव या मुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. या अपघातात ६ महिला आणि १२ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तर, जखमींमध्ये ७ महिला, १८ पुरुष आणि एका मुलीसह एकूण २६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. अपघातस्थळी लष्कर, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिसांच्या पथकांनी संयुक्त बचाव मोहीम सुरु आहे.

    #nepal accident Deaths Foreign Tourists Kathmandu Passenger Bus Rescue Operation Trishuli River
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026

    नागपुरात न्यायाधीश अन् वकिलाच्या मुलाचा मृत्यू

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.