ठेकेदार आणि इंजिनियर यांची पार्टनरशिप म्हणूनच…

रस्त्यांच्या निकृष्ट दर्जावर आमदारांचे खडे बोल

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम केले जाते. मात्र सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याला कारण म्हणजे रस्त्याचे काम करत असताना ठेकेदार आणि इंजिनिअर यांच्या पार्टनशीप असल्याने काम निकृष्ट होत असल्याचा गंभीर आरोप आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गोरंबा येथे निगधी ते लेगापाणी रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत सुरू असून कामाच्या ठिकाणी अक्कलकुवा धडगाव मतदार संघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी अचानक भेट देत कामाची पाहणी केली. या पाहणीत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आले आहे. यावेळी आमदार आमश्या पाडवी ठेकेदारावर चांगलेच संतापले.

आमदार पाडवी यांनी रस्त्याची पाहणी करत संबंधित ठेकेदाराला रस्ता दर्जेदार बनवण्याची सूचना दिल्या असून धडगाव- अक्कलकुवा तालुक्यात सुरू असलेल्या कामांची चौकशीची मागणी आमदार पाडवी यांनी केली आहे. तसेच या परिसरात ठेकेदार आणि इंजिनियर यांची पार्टनरशिप राहत असल्याचे गंभीर आरोप देखील आमदार आमश्या पाडवी यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग भागात पहिल्यांदाच आमदार आमश्या पाडवी पोहोचले. साधारण १५ किलोमीटरची पायपीट करत आमदार आमश्या पाडवी दुर्गम भागात पोहोचले. दुर्गम भागात सुरू असलेल्या कामांच्या पाहण्यासाठी अक्कलकुवा अक्राणी मतदार संघाचे आमदारांची पायपीट करून आदिवासी पाड्यांवर जायला रस्ते नसल्याने डोंगराळ भागातून नदी नाल्यातून प्रवास केला.

Leave A Reply

Your email address will not be published.