शेतकऱ्याच्या शेतातील मोटार चोरी प्रकरणी दोघांना ; अटक पारोळा पोलिसांची कारवाई

0

शेतकऱ्याच्या शेतातील मोटार चोरी प्रकरणी दोघांना अटक पारोळा पोलिसांची कारवाई

पारोळा प्रतिनिधी

पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील शेतकऱ्याच्या शेतातील मोटार चोरी प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर उपविभाग) यांनी चोरीच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने, प्रभारी अधिकारी सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोस्टे डी.बी. पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला.

तपासादरम्यान, पोउपनि अमरसिंग डी. वसाव, पोना संदिप सातपुते, पोकों अभिजित पाटील, पोकों विजय पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी योगेश उर्फ सुर्या रमेश पाटील (रा. शेवगे बु, ता. पारोळा, जि. जळगाव) आणि योगेश उर्फ खगेश शालीक मगर (रा. साकुर, ता. मालेगाव, जि. नाशिक, ह.मु. पारोळा) यांना ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील विजकीय मोटारी चोरल्याची कबुली दिली.

दरम्यान दोघाना ४ मार्च रोजी संध्याकाळी आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना संदिप सातपुते करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.