झोक्याच्या दोरीने वायरमनची गळफास घेत आत्महत्या

0

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क 

पारोळ्यात मराठे गल्लीतील रहिवासी ३६ वर्षीय वायरमन असलेल्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

पारोळा शहरातील मराठे गल्लीतील रहिवासी किरण (बंटी) प्रदिप सोनार वय ३६ यांनी आपल्या राहत्या घराच्या हॉलमध्ये रात्री एकच्या सुमारास झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांना पारोळा कुटीर रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

सुनील भालेराव यांच्या खबरीवरून पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, तसेच काका काकू असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर पारोळ्यात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते भडगाव तालुक्यातील गिरड येथे वायरमन म्हणून कर्तव्य बजावत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.