Thursday, May 26, 2022

पारोळा तालुक्यात मंदिरात चोरी ५२ हजाराचा ऐवज लंपास

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

पारोळा तालुक्यातील जोगल खेड्यातील सप्तशृंगी मंदिरात दानपेटी फोडून त्यातील ५० हजार रुपये रोख व दोन हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लांबवले असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

महेंद्र सुभाष पाटील यांच्या माहितीवरून त्यांच्या गट क्रमांक १२९ मध्ये लोकसहभागातून सप्तशृंगी मातेचे मंदिर बांधले असून दिनांक १४ च्या मध्यरात्री
मंदिरात चोरी झाल्याने मंदिरातील दानपेटी मंदिरातून उचलून एका सार्वजनिक जागेवर नेऊन तिला फोडण्यात आले, ज्यामध्ये भाविकांनी दान केलेल्या अंदाजे पन्नास हजार रुपये रोख व दोन हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे माहिती महेंद्र पाटील यांनी दिली.

ते सकाळी मंदिर उघडण्यास गेले असता त्यांना सदर बाब लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत पारोळा पोलिसांना कळविले. याबाबत पारोळा पोलीसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या