पारोळा तालुक्यात ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणीस सुरुवात

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासन, स्वामित्व योजनेंतर्गत भूमि अभिलेख विभाग, महसुल विभाग, ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत गावात चुना मार्किंग करून ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण करणे, ड्रोनव्दारे गावठाण भूमापन मोजणी प्रकल्पाचा शुभारंभ आमदार चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते पारोळा तालुक्यातील सावखेडे होळ येथे संपन्न झाला.

या सर्वेक्षणासाठी सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातुन पारोळा तालुक्यातील सावखेडे होळ गावाची निवड केल्याबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांचे मतदारसंघाच्या वतीने आ. चिमणराव पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, जि.प.सदस्य हिंमत पाटील, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख जळगांव एम.पी.मगर, गटविकासअधिकारी विजय लोंढे, सर्व्हे ऑफ इंडियाचे नवनाथ उगलमुगले, मोहन डेरे, उपअधिक्षक भूमिअभिलेख पारोळा भुषण घाडगे यांसह सावखेडे होळ, सावखेडे मराठ, सावखेडे तुर्क, सार्वे, येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here