तोतया अधिकारी शेतकऱ्याचे १ लाख घेवून पसार

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील रामनगर तांडा गावाजवळ दोन तोतया अधिकाऱ्यांनी शेतकयाच्या कापडी पिशवीतील १ लाख रुपयाची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश पंडित पाटील (वय ५२, रा. कन्हेरे ता. पारोळा, जळगाव) हे आपल्या परिवारासह राहतात. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सुरेश पाटील हे पारोळा तालुक्यातील ताडा फाट्याजवळ गावाकडे पायी जात असताना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीने आले. आम्ही गांजा अफू चेक करणारे अधिकारी आहोत असे सांगून सुरेश पाटील यांची हातात असलेल्या कापडी पिशवी चेक केली. त्यात एक लाख रुपये ठेवलेले होते है पैसे कशाचे आहेत असे विचारल्यावर मी बँकेतून काढले असल्याचे शेतकरी सुरेश पाटील यांनी सांगितले त्यावर चेक करु असे सांगून पैसे घेऊन दुचाकीवरून पसार झाले.

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर सुरेश पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.