पारोळा येथे शेतकऱ्यांचे बायपासवर रास्ता रोको काम बंद आंदोलन

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा शहरालगत बोदर्डे शिवारात शेतकऱ्यांनी उद्रेक करत बायपासचे काम बंद पाडुन रास्ता रोको केल्याने पोलिसांना ताफा व दंगा नियंत्रण पथक मागवण्याची वेळ आली. याप्रसंगी शेतकऱ्यांचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी केले त्यांनी स्पष्ट केले की सदर बायपासच्या कामात पारोळा येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्ग विभागाने ताब्यात घेऊन ही रकमेचा दुसरा हफ्ता न देता काम सुरू ठेवले आहे.

एकीकडे म्हसवे, विचखेडे, दळवेल आदी भागातील शेतकऱ्यांना रकमा अदा केल्या. गेल्या परंतु पारोळा येथील शेतकऱ्यांना वारंवार फिरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जोवर ठोस आश्वासन मिळत नाही. तोवर आम्ही काम सुरू करू देणार नसल्याची भूमिका घेत तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.

यावेळी महामार्ग विभागाचे पंकज प्रसाद व विश्वानजय बागडे तसेच पारोळा उप निरीक्षक रवींद्र बागुल, निलेश गायकवाड यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जोवर जिल्हाधिकारी हस्तक्षेप करणार नाही तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही ची भूमीका शेतकऱ्यांनी घेतली.

यावेळी पारोळा तहसीलदार अनिल गव्हांदे यांनी घटनास्थळी भेट देऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करत बोलणे करून दिले. याबाबत दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विभागीय पो नि राकेश जाधव यांनीही भेट देऊन आंदोलन कर्त्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी केली होती. त्यासाठी विशेष बंदोबस्त ही लावला गेला, परंतु तहसीलदार व महामार्ग विभागाने मध्यस्ती करीत चर्चा घडवून आणल्याने होणारी कारवाई टळली.

Leave A Reply

Your email address will not be published.