धक्कादायक : कापूस व्यापाऱ्याचे सात लाख रुपये लंपास 

0

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ रस्त्यावर दोन मोटरसायकली वरून चार जणांनी येत कारला अडवून सुमारे सहा लाख ९५ हजार रुपयाची रोकड लांबवल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली.

पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ धुळे येथील व्यापारी योगेश वाल्मीक पाटील रा. निमडाळे तालुका जिल्हा धुळे या व्यापाऱ्याने पारोळा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादनुसार, माझ्या स्वीफ्ट डिझायर एम एच -०१-बी. टी.८७९६ गाडीने तामसवाडी ता. पारोळा येथे शेतक-याची कापसाची उधारी देण्यासाठी पैसे घेवुन जात असतांना कराडी गावाचे अलीकडे १ कि.मी अंतरावर दोन विना क्रमांकाचे मोटारसायकली वरील चार इसमांनी माझ्या गाडीचे पुढील बाजुस व मागुन येवुन गाडी अडवुन माझ्या गाडीची चावी काढुन घेवुन “चुपचाप बैठनेका नही तो मारडालेगे” असे हिंदी भाषेत दम देवुन माझ्या कडील असलेली मागील सिटवर ठेवलेले ६ लाख ९५ हजार पांढ-या बॅगेतील रोख रक्कम बळजबरीने काढुन घेवुन बोळे गावाकडे पलायन केले.

या चारही अज्ञात चोरट्यांविरुध्द कापूस व्यापारी योगेश पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग बसावे हे तपास करीत आहेत.

एक पथक धुळ्याकडे रवाना

सदर पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवडील रस्ता लूटप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी एक विशेष पथक तयार करून धुळ्याकडे रवाना करण्यात आले आहे. तर इतर बीट पोलीस कर्मचाऱ्यांना बोळे, कराडी, तामसवाडी, ढोली, वेल्हाने या परिसरात तपासासाठी पाठवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.