बकऱ्या चोरट्यांची टोळी जेरबंद; १७ चोऱ्या उघडकीस

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. १ ऑगस्ट रोजी बकऱ्या चोरीची घटना घडली होती. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पारोळा पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे पळासखेडे येथिल सहा जणांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीत या गुन्ह्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्बल १७ चोऱ्या केल्याचे  कबूली दिली.

या टोळीस काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. या टोळीने जिल्ह्यातील विविध तब्बल १७ ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिलेली आहे. या सहा गुन्ह्यातील मुद्देमाल पारोळा पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे.  काही दिवसांपूर्वी पारोळा शहरात लगतच्या वंजारी शिवारातून २५ बकऱ्या चोरीस गेल्या होत्या याचा तपास पारोळा पोलीसांनी शिताफीने लावला आहे. यात पळासखेडे येथील सहा जणांना ताब्यात घेतले होते. तर त्याच चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोऱ्या केल्याचे मान्य केले आहे.

महेंद्र गणेश सुदाम पाटील (वय २८), वाल्मिक भगवान मराठे (वय २४), संजय सोमा जाधव (वय २७), अंकुश नेहरू पाटील (वय २३), रोशन महावीर ठगसेन पवार (वय १९) सर्व राहणार  पळासखेडा ता. पारोळा तसेच शिवाजी रामराव पाटील (वय २५, रा. जामोद ता. जि. जळगाव) व इतर दोन अल्पवयीन

यांनी संगनमत करून आरोपी क्रं १ ते ६ यांनी नमूद २५ बकऱ्या चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली. नमूद गुन्हात बकऱ्या वाहतूक करण्यासाठी वापरलेले महेंद्रा बोलेरो एम. एच. ०५. बी. एच. ८६३५ हे वाहन मालक आरोपी दुसरे वाहन महेंद्रा बोलेरो एम. एच. ०१. बी. आर. ०६२९ वाहन मालक आरोपी क्र २ यांचे असल्याचे व चोरीतही सहभागी असलेचे निष्पन्न झाले. नमूद आरोपींना अटक करून पारोळा न्यायालयात न्यायाधीश कमलेश माने यांच्या न्यायालया समक्ष हजर केले असता ६ दिवस पोलीस कोठडी मिळाली असून नमूद आरोपींनी १७ गुन्हे वरील आरोपींचे मदतीने केल्याची कबुली दिली.

यात पारोळा पो स्टे हद्दीत -६ गुन्हे त्यात बकऱ्या चोरीचे- २ गुन्हे (वरील फिर्यादी व यशवंत  दाजीबा पाटील चोरवड), बैल चोरीचे- २ गुन्हे, राजेंद्र सुरेश चौधरी रा. पारोळा व भट्ट छोटू पाटील रा राजवड यांचे बैल जोडी,-ठिबक नळ्या चोरीचे-२ गुन्हे तसेच अमळनेर पो स्टे हद्दीतील निंबा तुळशीराम पाटील रा. ढेकु यांचे ठिबक नळ्या चोरी केल्या असून धरणगाव  पो स्टे हद्दीतून  एकूण ६ चोऱ्या केल्या असून बैल जोडी एकूण ४ चोरल्याची कबुली दिली असून दीपक मधुकर सपकाळे रा. जाभोरा, दिगंबर भिल्स पाटील रा. उखरडवाडी, समाधान गोकुळ पाटील रा.  भामर्डी, संतोष शामराव माली रा. साकरे यांच्या बैलजोडी चोरीची कबुली दिली आहे. तसेच चोपडा सिटी पो स्टे येथून ३ गुन्हे केले असून २ गुन्हे मोटर सायकल चोरी व १ गुन्हा डी फ्रीज चोरी एक तसेच जळगाव तालुका पो स्टे हद्दीतील ठिबक नळ्या चोरी अश्या एकूण १७ गुन्हे केल्याची आरोपीनी कबुली दिली असून पारोळा पोलिसांनी एकूण ६ गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला असून इतर मुद्देमाल हस्तगत करण्या करीता तपास चालू आहे.

तसेच ज्यांनी वरील संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला नाही त्या फिर्यादीने तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद द्यावी, असे आवाहन पारोळा पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

सदर गुन्ह्याचा तपास जळगाव पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, कृषिकेश रावले सो, पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव अमळनेर यांचे मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, उपनिरीक्षक शेखर डोमाळे, जयवंत पाटील, पो. हे. कॉ. सुनील वानखेडे, पो. कॉ. प्रवीण पाटील, पो. ना. संदीप सातपुते, पो. कॉ. किशोर भोई, पो. कॉ. अभिजित पाटील, पो. कॉ. राहुल कोळी, पो. कॉ. राहुल पाटील, पो. कॉ. हेमचंद साबे यांनी तपास केलेला असून पुढील जप्ती कारवाई चालू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.