Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भयंकर.. पुतण्याने काकूला वाहनाखाली चिरडून केले ठार
    गुन्हे वार्ता

    भयंकर.. पुतण्याने काकूला वाहनाखाली चिरडून केले ठार

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 11, 2022No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर संतप्त झालेल्या पुतण्याने आपल्या काकूला वाहनाखाली चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना  घडली आहे.

    तालुक्यातील शेळावे खुर्द येथे मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आलीय.  शेळावे खुर्द येथील बापू सांगळे यांचे सख्खे भाऊ दत्तू सांगळे यांच्यासोबत गेल्या सुमारे सात वर्षांपासून वाद सुरू आहेत. या दोन्ही भावांची शेती लागून असून विहीरीवर पाणी भरण्याचा सामयिक अधिकार आहे. मात्र या दोन्ही भावांमध्ये बांधासह पाणी भरण्यावरून वाद सुरू आहेत.

    शुक्रवार दिनांक १० जून रोजी सकाळी पाणी भरण्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. यात अलकाबाई बापू सांगळे, विद्या महेंद्र सांगळे, मनीषा दत्तू सांगळे, दत्तू सांगळे हे आपापल्या शेतात काम करत असतांना पाण्याचा पंप बंद केल्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात विद्या सांगळे व मनीषा सांगळे या जखमी झाल्या.

    यानंतर दत्तू सांगळे यांचा मुलगा राहुल उर्फ सोनू सांगळे याने त्याच्या मालकीचे एमएच- १९, सीवाय- ८१८३ क्रमांकाचे छोटा हत्ती हे वाहन भरधाव वेगाने आपल्या काकू अलकाबाई बापू सांगळे यांच्या अंगावर घातले. यामुळे अलकाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

    याप्रकरणी राहुल उर्फ सोनू सांगळा याला पोलिसांनी अटक केली असून खुनाच्या कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सपोनि राजू जाधव करत आहेत.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news Parola
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif