पारोळ्यात संशयास्पद फिरणाऱ्या ११ इसमांवर कारवाई

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा शहरात वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण पाहता पारोळा पोलीस स्टेशनकडून दक्षता घेतली जात असून आज शहरात फिरणाऱ्या संशयास्पद फिरणाऱ्या ११ जणांवर कारवाई करण्यात आली.

गणेश शंकर चव्हाण (वय 26 रा. कसबे ता. जामनेर), दादाराव किसन चितोडे (रा. अंबडपेठ गल्ली अंबड ता. अंबड जि. जालना), काज्या अनाज्या वासकले (रा. रसमल ता. पाटी जि. बदवानी मध्यप्रदेश), तेवज्या बाक्या वासले (रा. रसमल ता. पती जि. बडवाणी मध्यप्रदेश), कमल दुकान्या वासले (रा. रसमल ता. पाटी जि. बडवाणी मध्यप्रदेश), राण्या रामसिंग वासले (रा. रसमल ता. पाटी जि. बडवानी मध्यप्रदेश), अनिल कटुल्या वासले (रा. रसमल ता. पाटी जि. बडवानी मध्यप्रदेश), संजय गुलाब शेमले (रा. गोलपाणी ता. पाटी जि. बडवानी मध्यप्रदेश), सोहज्या रामसिंग वासले, दिनेश सुकलाल वासले यांच्यावर कारवाई करण्यात आली.

पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, राजू जाधव, हेड कॉ महेंद्र मराठे, हेड कॉ इकबाल शेख, हेड कॉ जावेद शेख, पो ना संदीप सातपुते, पो कॉ किशोर भोई, पो कॉ अभिजित पाटील, पो कॉ आशिष गायकवाड यांनी पारोळा शहरात सापळा रचून संशयास्पद स्थितीत मिळून आल्याने त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वरील सर्व इसमावर प्रतिबंधक कारवाई केली.

या सर्वांना पारोळा तहसीलदार अनिल गवांदे यांच्या समक्ष हजर केले असता त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेतला असून वरील सर्व संशयित इसमावर त्यांचे राहते पत्यावर त्यांच्या पोलीस स्टेशन ला “ब” रोल सुद्धा पाठविला असून त्यांच्यावर गुन्हेगारी रेकॉर्ड असेल तर तेही सबंधित पो स्टे कडून मागवून घेतले आहे, त्यामुळे पारोळा शहरात विनाकारण भटकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहरासह तालुक्यात विनाकारण भटकणाऱ्यावर पारोळा पोलीस बारकाईने नजर ठेवून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.