वाहनाला वाचवण्याच्या नादात बस उलटली

मोठा अपघात टळला

0

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील वाघेरी येथे बसचा मोठा अपघात टळला आहे. महामार्गाने बस जात असताना समोरून ओव्हरटेक करत येत असलेला ट्रकची धडक वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा अपघात झाला. बस चालकाने प्रसंगावधान राखल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली असून यात दोन प्रवाशी जखमी झाले आहेत. सदरचा अपघात भडगावच्या पुढे घडला.

पारोळा तालुक्यातील वाघेरी येथे हा अपघात घडला आहे. पारोळा- भडगाव रस्त्यावरील वाघरी फाट्याजवळील पॉलिटेक्निक कॉलेज समोर उधना ते जामनेर ही बस अशी प्रवास करतांना पारोळा बसस्थानकावरून निघून भडगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. दरम्यान पारोळा- भडगाव रस्त्यावरील वाघरा- वाघरी फाट्या समोरून येणारा चालक हा महिंद्रा पिकअपला ओव्हरटेक करीत होता. भरधाव वेगाने येत असल्याने बसला धडकणार होती.

मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र बसचा वेग देखील अधिक असल्याने रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. या अपघातात चालक, वाहक तसेच प्रवाशी जखमी झाले आहे. बस चालकाच्या नियंत्रणामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत पारोळा पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.