वर्दीला काळिमा.. लाचखोर दोन पोलीस जाळ्यात

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा येथे खाकी वर्दीलाच काळिमा लागलीय. अपघात प्रकरणी आरोपीची अटक टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पारोळा येथील दोन पोलिसांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा पोलीस स्टेशनला असलेले हिरालाल देवीदास पाटील (४३, रा. हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर) व प्रवीण विश्वास पाटील (४५, रा. पोलिस वसाहत,  पारोळा) या दोन्ही दोन्ही पोलिसांना जेरबंद करण्यात आले आहे.   तक्रारदार हे ७ नोव्हेंबर रोजी दुचाकीने पारोळ्याहून धरणगावकडे जात असताना त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची समोरा सम़ोर धडक होऊन त्यावरील चालक ठार झाला.

याबाबत तक्रारदाराविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या प्रकरणात तक्रारदाराची अटक टाळण्यासाठी संशयित दोन्ही पोलिसांनी त्यांच्याकडे ३० हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती १५ हजाराची देण्याचे ठरले.  त्यानुसार पारोळा पोलीस स्टेशनचे पो. हवालदार हिरालाल विश्वास पाटील यांनी १५ हजाराची रक्कम घेतली. रक्कम घेताच त्यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

यातील दुसरा आरोपी पो. हवालदार प्रविण पाटील पसार झाले आहेत. याबाबत वरील दोघं संशयितांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राजन कदम, मुकेश आहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.