पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळ्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सार्वे गावानजीक बस व गॅस टँकरचा अपघात झाला. या अपघातात बसमधील ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथून लोणी फरकांडे कासोदा बस महामार्गावरून जात असताना बस चालकाने सार्वेनजीक महामार्गाला कट नसल्यामुळे बाभळेनाग फाट्यापासून आऊटसाईडला बस टाकून दिल्यामुळे समोरून येणाऱ्या गॅस टँकरला बस धडकल्यामुळे त्यात बसमधील प्रवासी जखमी झाले.
कच्छलाबाई काशिनाथ मकासरे (वय ६०, रा. सार्वे), रंजनाबाई रमेश शिरसाठ (वय ५०), रमेश धर्मा शिरसाट (वय ६८) दोघे रा. जायखेडा ता. सटाणा, प्रशांत प्रभाकर पाटील (वय ३२, रा. लोणी), लता विठ्ठल देसले (वय ५२, रा. साईबाबा कोपरगाव), कल्पना भीमराव पाटील (वय ५०, रा. मोरफळ), सुरेखा दिनेश देवरे (वय ३४), दिनेश यशवंत देवरे (वय ४०, रा. रावळगाव मालेगाव), अरुणाबाई नारायण पाटील (वय ६५, रा. लोणी खुर्द तालुका पारोळा) हे जखमी झाले.
जखमी प्रवाशांवर पारोळा कुटीर रुग्णालयात डॉ. प्रशांत सोनवणे, परिचारका कामिनी पवार, अनिता माळी, राजू वानखेडे, दीपक पाटील, अजय पटाडे यांनी उपचार केले. यातील तीन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.घटनास्थळावरील जखमींना रुग्णवाहिका चालक प्रसाद राजहंस, आशुतोष शेलार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले.