कारचा भीषण अपघात.. दोघांचा मृत्यू

५०० फूट दूर फेकली गेली कार , विचखेडे गावाजवळील घटना 

0

 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क

‎विचखेडे गावाजवळ धुळ्याकडे ‎जाणाऱ्या स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा‎ सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळी‎ उलटली. त्यात कारमधील दाेघांचा मृत्यू‎ झाला. तर दाेन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ‎घडली.

राहुल भाऊसाहेब अहिरे (वय २८)‎ व नीलेश सुरेश पाटील (वय २३) रा.‎तरवाडे जि. धुळे अशी मयतांची नावे आहेत.‎

पारोळ्याकडून धुळ्याकडे जाणारी ‎स्विफ्ट कारमध्ये नीलेश पाटील, गोविंद‎ भास्कर राठोड (वय २४) रा. तरवाडे ,‎राहुल अहिरे हे तिघे व महेश आत्माराम‎ पाटील (वय २१) रा. मोंढाळे प्र. अ. ता.‎पारोळा हे धुळ्याकडे भरधाव वेगाने जात‎ हाेते. पारोळा शहरानजीक असलेल्या‎विचखेडा गावाच्या अलीकडे कार चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार‎ रोडच्या कडेला चार वेळा उलटून पाचशे‎ फुटांवर फेकली गेली. यात राहुल पाटील याचा‎ जागीच मृत्यू झाला. तर नीलेश पाटील‎ याला उपचारासाठी धुळे येथे नेत असताना‎ रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

तर महेश देवरे व‎ गोविंदा वंजारी हे गंभीररीत्या जखमी झाले.‎ पारोळा कुटीर रुग्णालयात‎ दाखल करण्यात आले. यातील गोविंदा‎राठाेड यांनाही धुळे येथे हलवण्यात आले‎ आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल‎करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती‎ देण्यात आली.‎

 

Leave A Reply

Your email address will not be published.