आयशरच्या अपघातात मंगरूळ येथील चालकाचा मृत्यू

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखांब गावाजवळ काल रात्री १२ वाजेच्या सुमारास  धुळ्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक अंधारात मातीच्या डिगाऱ्यावरून पलटी झाला. या झालेल्या अपघातात पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवासी असलेल्या चालकाचा जागीच मृत्यु झाला. तर या घटनेत १ जण जखमी झाला आहे. या घटनेने मंगरुळ गावात शोककळा पसरली आहे.

चोपडा तालुक्यातील वेले येथून आयशर मधून टरबुज घेऊन सुरत कडे जात असतांना सोनखांब गावा जवळ हा अपघात झाला. त्यात आयशर चालक राजेंद्र दत्तु पाटील (२५) रा. मंगरूळ ता पारोळा याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शेतकरी रघुनाथ पाटील हे जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की आयशरची केबिन चक्काचूर झाली. मयत राजेंद्र पाटील यांचे पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.