pro audio land coupon citrus lane box coupon code alignabod coupon code osaka coupons cedar rapids iowa
Thursday, December 1, 2022

३८३ वर्षाची परंपरा असलेल्या ब्रह्मोत्सवाला २६ सप्टेंबरपासून सुरुवात

- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

सालाबाद प्रमाणे यंदाही बालाजी महाराजांच्या नवरात्रोत्सव हा ब्रह्मोत्सव म्हणून दिनांक २६ सप्टेंबर पासून ते दिनांक १० ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पारोळा येथील जागृत दैवत प्रभू बालाजी यांचा नवरात्रोत्सव हा शहरासह तालुक्यात ब्रहमोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो.  मागील दोन वर्षांपासून या उत्सवावर कोरोनाचे सावट होते म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता, परंतु या वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आज पारोळा येथील बालाजी संस्थानच्या सभागृहात पत्रकार परिषदेत संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

- Advertisement -

यावर्षी हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा सोमवार दिनांक २६ सप्टेंबर पासून ते अश्विन सोमवार दिनांक १० ऑक्टोंबर २०२२ पर्यंत ब्रह्मोत्सव म्हणून शहरात मोठा उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.

याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा होऊन पुढील नवरात्र उत्सव व रथोत्सव हा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावा अशी विनंती बालाजी संस्थांच्या वतीने विश्वस्त अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांनी केली.  याप्रसंगी बालाजी संस्थांच्या वतीने संस्थानाच्या माध्यमातून ३० रुपयात प्रसादाची (जेवणाची) सोय केली आहे.  तसेच वस्तू संग्रहालय भक्तनिवास अद्यावत हॉस्पिटल, संस्कृतीत हॉल, प्रसादालय, कल्याण कट्टा असे संयुक्त वास्तू उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच भावी भक्तांसाठी यासाठी सरळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

येत्या काही काळात संस्थानच्या वतीने विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणार आहोत, असे बालाजी संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे विश्वस्त केशव, क्षत्रिय रावसाहेब भोसले, अनिल गुजराती, प्रकाश शिंपी, संजय कासार, प्रमोद शिरोळे, अरुण वाणी, दिनेश गुजराती यांच्यासह पारोळा येथील दर्पण पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या