लम्पीला आळा घालण्यासाठी जनजागृती प्रचार रथाचा शुभारंभ

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यात गुरांवरील लम्पी रोगाने थैमान घातले आहे.  यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  या रोगाबाबत माहिती व्हावी यासाठी पारोळा येथील साई हाॅस्पिटलचे डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या संकल्पनेतून स्वखर्चाने पारोळा येथुन प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

जिल्ह्यासह पारोळा तालुक्यातील गावांमध्ये सध्या जनावरांवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याबाबत शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच याबाबत अधिक माहिती नसल्याने शेतकरी आपली गुरे ढोरे कवडी मोल भावाने विकत आहेत या रोगाबाबत जनजागरूती व्हावी तसेच शेतकऱ्यामधील भिती कमी व्हावी म्हणून पारोळा येथील साई हाॅस्पिटलचे संचालक डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. हा जनजागृती रथा द्वारे तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात जाऊन जनजागृती पर संदेश दिला जाईल असे डॉ. संभाजीराजे पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

सध्या पारोळा तालुक्यात लम्पीग्रस्त ५४ जनावरे आहेत.  या सर्व जनावरांना आयसोलेट केले असून तालुक्यातील प्रत्येक गावात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. योगेश देशमुख यांनी दिली.

यावेळी डॉ. संभाजी राजे पाटील, डॉ. महेश पवार, डॉ. बि. एस. सुर्यवंशी, डॉ. शांताराम पाटील, डॉ. वाय.  के. देशमुख, डॉ. सविता पिनलकर, डॉ. बाळु राठोड, डॉ. संदीप राजपूत, डॉ. डि पी. पाटील, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. उदय बोरसे, अनिल जाधव, भिकन पाटील, पी. बी. पाटील, भुषण पाटील, समाधान महाजन, मिथुन पवार, प्रकाश राठोड, अशोक मोरे, अनिल पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.