पारोळा येथे भीषण अपघात; सबगव्हाण येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

0

पारोळा येथे भीषण अपघात; सबगव्हाण येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पारोळा प्रतिनिधी

पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (२० ऑक्टोबर) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात सबगव्हाण येथील एका तरुण दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेत सुरज शामदास ठाकरे (वय २५, रा. सबगव्हाण, ता. पारोळा) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, सबगव्हाण येथे वास्तव्यास असलेला सुरज ठाकरे हा तरुण सोमवारी मध्यरात्री २ वाजता त्याची दुचाकी क्रमांक (एमएच ५४ डी ६३४७) घेऊन राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. यावेळी त्याची दुचाकीला जोरदार धडक बसली. ही धडक कोणत्या वाहनाला किंवा वस्तूला बसली, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

या अपघातात सुरज ठाकरे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने कुटिर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पारोळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.