पारोळा येथे किल्ल्यासाठी मावळे सरसावले

भुईकोट किल्ल्यावर होणार साफ सफाई

0

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा शहराचे वैभव असलेल्या  झाशीच्या राणीचे माहेरघर म्हणून प्रख्यात असलेल्या भुईकोट किल्ल्यावर दुर्लक्षामुळे प्रचंड प्रमाणात घाण झाली आहे. किल्ल्याच्या चारही बाजुंनी असलेल्या तटबंदिवर मोठया प्रमाणात झुडपे उगवली आहेत. त्यांना वेळीच आवर न घातल्यास किल्ल्याचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. ही  बाब लक्षात घेऊन राजा शिवछत्रपती परिवार जळगाव यांनी राज्यस्तरीय स्वछता मोहिमेचे आयोजन पारोळा येथे केले आहे.

त्यासाठी या परिवाराचे राज्यभरातील तीस जिल्ह्यातील मावळे रात्रीपासून शहरात दाखल झाले आहेत. सदर मोहीम दोन दिवसीय असून पहिल्या दिवशी किल्ल्यावर स्वछता मोहीम राबवली जाईल तर दुसऱ्या दिवशी रविवारी अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करून त्यातून समाजात गडकिल्ल्यांविषयी आवड निर्माण व्हावी असा प्रयत्न या परिवाराच्या वतीने केला जाणार आहे.

रावेर येथील मुलींचे मर्दानी खेळ करणारे पथक या पालखी सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. पारोळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मोहिमेचा शुभारंभ होईल. सकाळी आठ ते दुपारी एक असे सलग पाच तास किल्ल्याच्या आतील व बाहेरील बाजूस साफसफाई अभियान राबवून किल्ल्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे राजा शिवछत्रपती परिवार यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.