पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क
तालुक्यातील शेळावे येथे एका शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील शेळावे येथील शेतकरी वासुदेव त्र्यंबक पाटील (वय ६२) हे आपल्या शेतात शेती कामासाठी गेले होते. फवारणीच्या पंपात पाणी भरण्यासाठी विहिरीतून पाणी काढत असताना अचानक पाय घसरल्याने ते विहिरीत पडले.
दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.