पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा तांडा येथील दिपाली आलम चव्हाण (वय २३) हि विवाहिता आपल्या तीन वर्षीय मुलगी किर्ती चव्हाण यांसह दि. ९ जुलै रोजी रात्री ११ वाजेपासुन पिंपळकोठा तांडा येथील आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळकोठा तांडा येथील आलम इंदल चव्हाण (वय ३०) हे पत्नी दिपाली, मुलगा यश, मुलगी किर्ती, वडील इंदल चव्हाण, आई द्वारकाबाई यांच्यासह एकत्र राहत असून आलम चव्हाण हा दहीवद ता. शिरपूर, जि. धुळे येथील टॅक्सेल कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात तसेच हाडाखेड ता. शिरपूर येथे भाड्याने रुम घेऊन पत्नी व मुलाबाळांसोबत राहत होते. दि.३ रोजी ते सर्व कामानिमित्ताने आपल्या गावी पारोळा तालुक्यातील पिंपळकोठे येथे आले होते.
तसेच आलम चव्हाण हा पत्नी व मुलांना आपल्या आई वडीलांकडे सोडून दि.६ रोजी आपल्या नोकरीच्या ठिकाणी दहिवद येथे गेला. दि. ९ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांचे वडील इंदल चव्हाण यांनी फोन करून सांगितले की, तुझी पत्नी दिपाली व मुलगी किर्ती हे दोघे कुठे घरात दिसत नाही. सर्वांकडे शोध घेतला असता मिळून आले नाही. हे ऐकून आलम चव्हाण हा लागलीच गावाला पिंपळकोठा येथे आला आणि पारोळा पोलिस स्टेशनला जाऊन खबर दिली.
दिलेल्या खबरीवरून पारोळा पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. संदिप सातपुते हे करित आहे.