स्कुटीच्या डिक्कीतून शेतकऱ्याचे तीन लाख लंपास 

अज्ञात चोरटे CCTV मध्ये कैद 

0

 

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क 

येथील स्टेट बँकेत वाघरे येथील शेतकऱ्याने ४ लाख ८० हजार रुपयाचे सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते, त्यातील तीन लाख रुपये आपल्या स्कुटीच्या डिक्कीत ठेवले होते. या घटनेकडे अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत डिक्कीतून तीन लाख रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

आज दिनांक 18 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाघरे ता. पारोळा येथील शेतकरी प्रकाश विठ्ठल पाटील यांनी शेती व्यवसायासाठी आपल्या कडील सोने पारोळा येथील भारतीय स्टेट बँकेत गहाण ठेवूण त्या पोटी ४ लाख ८० हजार रुपयेचे कर्ज काढले होते. त्यातुन १ लाख ८० हजाराची रक्कम आपल्या जवळ ठेवून उर्वरीत रक्कम आपल्या जवळील स्कुटी क्रं एम एच 19 डी वाय 0396 डिक्कीत ठेवली होती .

स्टेट बँकेमधून स्कुटीने व्यकटेश नगर येथे असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे कामा निमित्त गेले असता स्कुटी अंगणात लावून गेले होते .

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्याठिकाणी पैसे न काढता स्कुटी गाडी घेऊन पसार झाले. त्यानंतर या चोरट्यांनी काही अंतरावर असलेल्या राणी लक्ष्मीबाई नगर येथे स्कुटीच्या डिक्कीतुन तीन लाख रुपये काढून स्कुटी त्याच ठिकाणी लाऊन पसार झाले.

याबाबत सर्वत्र सीसीटीव्ही चेक केले असता स्टेट बँक परिसरातुनच हे चोरटे या वृद्ध दापंत्यावर पाळत ठेवून होते. हे वृद्ध ज्या ठिकाणी गेले. त्या सर्वत्र ठिकाणी अज्ञात तीन इसम त्यांच्या मागेच होते. आपल्या नातेवाईकांच्या अंगणात लावलेली स्कुटी घेऊन पसार झाले. या सर्व घटना शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. सीसीटीव्हीत चोर कैद झाले असल्याने पोलिसांसमोर चोरटे पकडण्याचे आव्हान आहे, याबाबत पोलिसात रात्री उशीरा पर्यंत पारोळा पोलिसात गुन्ह्याची नोंद सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.