पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क
पारोळा शहरातील भोसले गल्ली येथील रहिवाशी राकेश आबा मराठे यांनी विषारी औषध सेवनाने मृत्यू झाल्याची घटना दिनांक ७ रोजी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील रहिवासी सतीश खाडे यांनी पारोळा पोलीस स्टेशनला दिलेल्या दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक सात रोजी
राकेश आबा मराठे (वय 24, रा. भोसले गल्ली ता. पारोळा) याने पोपट नगर शिवारातील शेतात काहीतरी विषारी औषध सेवन केल्याची माहिती मिळाल्याने याबाबत घटनास्थळी राकेश मराठे याच्याजवळ विषारी औषधाची पिशवी पडलेली होती व त्याच्या नाका तोंडातून काहीतरी विषारी औषधाचा वास येत होता. यावेळी लागलीच त्यास खाजगी रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालय येथे पुढील उपचाराकामी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून सायंकाळी मयत घोषित केले.
याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहे.
दरम्यान २४ वर्षीय युवकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.