Sunday, November 27, 2022

पारोळ्यात शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क                       

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यासह पारोळा तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने पारोळा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

पारोळा तालुका कापूस पट्टा म्हणून गणला जातो, परंतु गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अचानकपणे पाऊस कोसळत असल्याने ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच गावांना अशीच परिस्थिती असल्याने सध्या तालुक्यातील गावागावातून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या कापूस पिकाच्या नुकसानीची कैफियत मांडली आहे.  शेतकऱ्यांनी जगावे की मरावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने वरील बाबींचा विचार करून झालेल्या नुकसानीचा तलाठी व कृषी  सहाय्यकांना पंचनामे करण्याचे आदेश देऊन अतिवृष्टी अनुदान व पिक विम्याचा पिक विमा कंपनीने पीक विमा मंजूर करावा अशा आशयाचे निवेदन आज पारोळा येथील नायब तहसीलदार मुळीक व नायब तहसीलदार शिंदे यांना देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष भिकनराव पाटील, कार्याध्यक्ष अधिकार पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर पाटील, मार्गदर्शक डॉ. डी. एन. पाटील जिजाबराव पाटील, प्रसिद्धीप्रमुख वाल्मीक पाटील, संतोष पाटील, सुनील पाटील, जगदीश मनोरे, समाधान पाटील, छावा अध्यक्ष विजय पाटील, राजाराम पाटील, निरंक पाटील, मनोज पाटील, युवराज पाटील, पारोळा तालुक्यातील पदाधिकारी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या