पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा शहरातील समस्यांचा पाढा काही केल्या कमी होत नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे बाजारपेठेतील मुख्य रस्त्ये, एक तर शहरात जेमतेम एकच बाजारपेठ आहे ती ही नेहमीच समस्या ग्रस्त असलेल्या अवस्थेत असते. कधी अतिक्रमण तर कधी येथील संपुर्ण बाजारासाठी एकच असलेले स्वच्छता गृह ते पण अस्वच्छ व तुंबलेल्या अवस्थेत असल्याने येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासना विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.
स्वच्छता गृहाला टाळे
बाजार पेठेत एकच स्वच्छता गृह आहे जे लिकेज् व तुंबलेल्या अवस्थेत असल्याने त्या स्वच्छता गृहला येथील स्थानिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून या स्वच्छता गृहास देखील टाळे ठोकले आहे. एकीकडे संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत लाखो रुपये खर्च केले जात आहेत, तर दुसरीकडे मात्र भर बाजारात स्वच्छता गृहच नसल्याने अनेकांना लघुशंकेसाठी उघड्यावर जावे लागत आहे.
रस्त्यांची दयनीय अवस्था
बाजारपेठेतील रस्त्याची दयनिय अवस्था झाली असुन रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी या रस्त्याला डबक्यांचे स्वरुप प्राप्त होत आहे. याच ठिकाणी भाजीपाला मार्केट असल्याने सकाळी येथे शेतकऱ्यांची बरीच गर्दी असते त्यात मार्केट मध्ये जाण्यासाठी रस्ताच दिसत नाही . हा रस्ता लोप पावला कि काय? अशी अवस्था सद्या यतरी दिसून येत आहे.
तुंबलेल्या गटारी
ह्याच रस्त्यावर गटार अवस्थेत पाणी तुंबलेले असते त्याच वेळी या भागातील व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी येतात तेव्हा या गटार सदुर्श्य डबक्यातुन वाट काढत जावे लागते. सकाळी घरून दुकानावर फ्रेश मुड मध्ये आलेला नागरीक व व्यापारी येथे येऊन मात्र हिरमुसला जातो. त्यातच येथुन जाणाऱ्या वाहानामुळे आजुबाजुच्या दुकानात हे घाण पाणी दुकानात शिरते. अनेकवेळा नागरिकांसह येथील व्यापाऱ्यांनी नगरपालिका प्रशासकांना समस्या चा पाढाच वाचून दाखविला. परंतु लोकप्रतिनिधी प्रमाणे फक्त आश्वासन दिले जातात. काम मात्र जैसे थे परिस्थितीत असल्याने बाजारपेठेत ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती असे म्हणतात कि या बाजारपेठेचे रस्त्यांचे भाग्य कधी उजाळेल ? नगरपालिकेच्या वतीने बाजारपेठेत साधे स्वच्छता गृह देखील नाही हि या पारोळ्याची शोकांतिका असल्याने नागरीकांनी नगरपालिका प्रशासना विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे .