पारोळा येथे बकरी ईद च्या दिवशी कुरबानी न देण्याचा निर्णय

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा येथील पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत येणाऱ्या २९ तारखेला आषाढी एकादशी व बकरी ईद एकत्र येत असल्याने त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी एकमताने घेऊन त्यासंबंधीची घोषणा बड़ा मोहल्ला येथील ज्येष्ठ बुजुर्ग समसउद्दीन मौलवी यांनी या बैठकीत केली. याप्रसंगी संपूर्ण बैठकीतील उपस्थितांनी या निर्णयाचा टाळ्यांच्या कडकटात स्वागत केले.याप्रसंगी अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस उपाधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे उपस्थित होते.

पोलिस उपधीक्षक सुनिल नंदवाळकर यांनी पारोळा शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले असुन त्याला आळा घालण्यासाठी शहराच्या प्रमुख भागात सि सि टि व्ही नगरपालिकेने लोकसहभागातुन बसवावे जेणे करून चोरांवर वचक बसेल व चोर्यांच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल यावेळी बैठकीस नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक संघमित्रा संधानशिव, डॉ. ए. डी. पाटील, आरोग्य विभागाचे भिकन नरवाळे, जामा मशीद चे मौलाना गुलाम मुर्तुजा, अजित मन्सुरी, शेख जुबेर शेख गफार, महंमद खान याकूब खान, नौरोदिन शेख अल्लाउद्दीन, बबलू कुरेशी, रशीद खान कुरेशी शमशोद्दीन मौलान, अजीज मोहम्मद मन्सुरी, शेख नुरुद्दीन शेख अल्लाउद्दीन, सिकंदरखान बाबेखान पठाण, मोहम्मद पठाण,, हाजी युसुफ, जुबेर अहमद शेखा आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.