टिटवी येथे घराला आग लागून लाखोंचे नुकसान

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पारोळा तालुक्यातील टिटवी येथे घराला आग लागून पंधरा क्विंटल कापसासह संसारोपयोगी वस्तू जळून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना दि.१६ च्या रात्री दहाच्या सुमारास घडली. निखिल कैलास पाटील, टिटवी (ता. पारोळा) यांनी पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की, मी, आई व वडील आम्ही १६ रोजी रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जेवण करून घराच्या धाब्यावरती झोपायला गेलो असता काही वेळानंतर घराच्या शेजारी राहणारे दगडू धनराज पाटील यांनी घराच्या सान्यातून धूर निघाल्याचे बघुन आग लागल्याचे कळविले. यावेळी आम्ही व आजूबाजूचा लोकांनी आग विझवण्यासाठी समोरचा विहिरीतून मोटारीने पाणी मारून तसेच पारोळा नगरपालिकेचे अग्निशमन दल तेथे पाचारण झाल्याने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत घरातील पंधरा क्विंटल कापूससह टी.व्ही, कुलर, लाकडी कॉट, कपडे असे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले. तर काही उर्वरीत कापूस ओला व खराब होऊन सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.