पारोळा नगरपालिकेच्या नविन करवाढीस अखेर स्थगिती

0

डॉ,मंगेश तांबे यांच्या प्रयत्नाना यश

पारोळा
पारोळा नगरपालिकेच्या वतीने नवीन घरपट्टी आकारणीने शहरातील नागरिकां मध्ये नाराजीचा सूर उमटला होता.मात्र पारोळा नगरपालिकेच्या नविन करवाढीस अखेर स्थगिती मिळाली असून डॉ,मंगेश तांबे यांच्या प्रयत्नाना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा नगरपालिकेने नवीन करप्रणाली अंतर्गत पारोळा शहरात नवीन घरपट्टी आकारणी केली होती तसेच शहरातील व्यापारी गाळ्यांची भाडे आकारणी दुप्पट केली होती त्यामुळे शहरात या घरपट्टी व भाडेवाढ प्रकरणी शहरात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली जात होती परंतु याबद्दल कोणीही आवाज उठवायला तैय्यार नव्हते. अनेक दिवस या विषयावर शहरात फक्त चर्चा होत होत्या . परंतु मार्ग काढण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हता म्हणून शहरातील व्यापार्यांनी येथिल मा, उपनगराध्यक्ष डॉ मंगेश तांबे यांच्या कडे आपले म्हणणे सांगुन आपण यात लक्ष घालावे अशी विनंती केली होती . याप्रसंगी डॉ मंगेश तांबे यांनी पारोळ्याच्या हितासाठी माझ्याकडून जे होईल ते मी करेन असा शब्द दिला व त्यांनी हि गोष्ट पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या कडे सविस्तर माहिती सांगितली .

शहरातील नागरिकांच्या हितासाठी आपण या घरपट्टी व भाडेवाढ याला स्थगिती मिळुन द्यावी अशी विनंती केली . आमदार चिमणराव पाटील यांनी या प्रकरणी महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा मुद्दा सविस्तर सांगितला. तसेच त्यांना विनंती करण्यात आली कि जो पर्यंत निवडणूक होऊन नविन कार्यकारिणी अस्तित्वात येत नाही तोपर्यंत जुन्या पध्दतीनेच घरपट्टी व गाळेभाडे वसुल करण्यात यावे अशी विनंती केली मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा करून सदर मुद्दा लक्षात आल्यानंतर त्यांनी जोपर्यंत नवीन निवडणूक होऊन नविन कार्यकारणी निवडणू येत नाही तोपर्यंत या नवीन घरपट्टी व भाडेवाढ याला स्थगिती दिली तसेच जुन्या पध्दतीनेच घरपट्टी व गाळे भाडे वसुल करावे असे आदेश दिले.

या सर्व घडामोडीत जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी जातीने लक्ष घालून हि प्रक्रिया पार पाडली तसेच या सर्व प्रकरणात आमदार चिमणराव पाटील यांचे स्वियसाहायक यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले या सर्व प्रकरणामुळे शहरातील सर्व सामान्य जनतेचे होणारे आर्थिक नुकसान थांबले अशी चर्चा सध्या पारोळा शहरात सुरू आहे तसेच याप्रकरणी पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील तसेच जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील व माजी उपनगराध्यक्ष डॉ मंगेश तांबे यांचे अनेकांनी आभार मानले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.