येत्या रविवारी नवीन संसदेच्या इमारतीचं उदघाटन, ७५ रुपयांच नवं नाणं होणार जारी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते येत्या रविवारी २८ मे रोजी नवीन संसदेच्या इमारतीचं उदघाटन होत आहे. या सोहळ्याला काँग्रेस विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएचे घटक पक्ष नसलेल्या इतर अनेक पक्षांनी या सोहळ्याला हजर राहण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या उदघाटन सोहळ्यात पंतप्रधान मोदी ७५ रुपयांचा नवं नाणं जारी करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भावनाचे २८ मे रोजी वेड मंत्रांच्या उद्घोषात उदघाटन करतील. त्याच वेळी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ७५ रुपयांचं नवं नाणं जरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाण्यावर नव्या संसद भवनाचं चित्र असेल. संसद भवनाच्या इमारतीच्या चित्राखाली साल 2023 देखील लिहीलेलं असेल. यात नाण्यावर हिंदी आणि इंग्रजीत संसद संकुल आणि parliament complex लिहीलेलं असेल. तसेच हिंदीत भारत आणि इंग्रजीत इंडीया लिहीलेलं असेल. तसेच अशोक चिन्हं देखील असेल.

नाण्याची वैशिष्ट्यं पाहूया
या नाण्याचं वजन 35 ग्राम असेल, हे नाणं 50 टक्के चांदी, 40 टक्के कॉपर, पाच-पाच टक्के निकेल आणि झिंक धातूच्या मिश्रणापासून तयार झालेलं असेल. नाण्याच्या किनारी गोलाकार नक्षी असेल. नवीन संसद भवनाचं उद्घाटन वेद मंत्रोच्चारात रविवारी होईल. यावेळी चौल सामाज्राचे प्रतिक असलेला राजदंड सेन्गोल नवीन संसद भवनाच्या लोकसभा अध्यक्षाच्या आसनाजवळ स्थापित केला जाईल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.