नवी दिल्ल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
पार्ले-जी हे बिस्किट प्रचंड लोकप्रिय आहे. पार्ले-जी बिस्कीटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे बिस्किटच्या कव्हरवर असलेल्या चिमुरड्या मुलीचा फोटो. पण आश्चर्याची बाब म्हणजे पार्लेच्या पुड्यावर दिणारी मुलगी आता गायब झालीये. आता पार्लेजीच्या कव्हरवर एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो छापण्यात आला आहे.
सोशल मीडियावर पार्लेजी कंपनीकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये बिस्कीटाच्या कव्हर फोटोवर पार्ले-जी गर्लऐवजी कंटेट क्रिएटर जेरवान जे बुन्शाह ह्याचा फोटो छापण्यात आला आहे. सुरुवातीला ही पोस्ट पाहून सारेच चकित झाले आहेत. पण नेमकं असं काय घडलं हे जाणून घेऊयात. बन्शाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
या व्हिडिओत त्याने त्याच्या फॉलोअर्सना एक प्रश्न विचारला आहे. त्याने व्हिडिओत विचारलं आहे की, जर तुम्ही पार्ले जीच्या मालकांना भेटाल तर त्यांना तुम्ही पार्ले-सर, मिस्टर पार्ले किंवा पार्ले-जी या नावाने हाक माराल का? या व्हिडिओत बुन्शाहने चेहऱ्यावरही गोंधळलेले भाव आणले आहेत. तर, बॅकग्राउंडमध्ये ऐ जी ओ जी हे गाणं ठेवण्यात आलं आहे.