Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»एनसीपीएच्या “प्रतिबिंब” महोत्सवात परिवर्तनची बहिणाबाई
    महाराष्ट्र

    एनसीपीएच्या “प्रतिबिंब” महोत्सवात परिवर्तनची बहिणाबाई

    काव्यात्मक जीवनपट उलगडणाऱ्या "अरे संसार संसार"ची निवड
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 29, 2026No Comments38 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    एनसीपी म्हणजे नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट हे सेंटर जगभरात विख्यात आहे. मुंबईमधील नरिमन पॉईंटच्या समोर मरीन ड्राईव्हला असलेले अत्यंत देखणे सेंटर आहे. या संस्थेच्यावतीने दरवर्षी मराठीतील सर्वोत्कृष्ट कलाकृती “प्रतिबिंब” या महोत्सवात निवडल्या जातात. “प्रतिबिंब २०२६” महोत्सवात परिवर्तन जळगाव निर्मित बहिणाबाईंच्या गाणी व कविता आणि जीवन याचा शोध घेणारा कार्यक्रम “अरे संसार संसार” ची निवड करण्यात आलेली आहे.

    एन. सी. पी. ए. चा प्रतिबिंब महोत्सव हा अत्यंत सन्मानाचा महोत्सव आहे. या महोत्सवात परिवर्तनची निवड होणे ही खानदेशसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वी खानदेशामधून कधीही एनसीपीसाठी कोणत्याही कलाप्रकाराची निवड झालेली नाही. हा सन्मान पहिल्यांदा खानदेशला मिळालेला आहे, याचा खूप आनंद आहे. अशी भावना परिवर्तन परिवारामधून आलेली आहे.

    या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शक नारायण बाविस्कर आहेत. संगीत नियोजक सुदीप्ता सरकार व मंजुषा भिडे आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रधार हर्षल पाटील आहेत. या कार्यक्रमात गोविंद मोकाशी, श्रद्धा पुराणीक कुलकर्णी, अंजली धुमाळ, सोनाली पाटील, मंजुषा भिडे, जयश्री पाटील, भूषण गुरव, रोहित बोरसे, सुनीला भोलाणे, समृद्धी पाटील, यश महाजन, शुभार्थी कुलकर्णी, अक्षय नेहे, हर्षल पाटील हे कलावंत आहेत. शंभू पाटील हे या कार्यक्रमाचे निवेदन करतात. निर्मिती प्रमुख विनोद पाटील व मंगेश कुलकर्णी आहेत. राहुल निंबाळकर यांचे तांत्रिक सहाय्य या कार्यक्रमाला लाभले आहे.

    परिवर्तनच्या या यशाबद्दल जैन उद्योग समूहाचे अशोक भाऊ जैन, अनिल कांकरिया, अनिश शहा, नंदलाल गादिया, किरण बच्छाव, अमर कुकरेजा, छबीराज राणे, नंदकुमार अडवाणी, डॉ. रेखा महाजन, मानसी गगडाणी, पारस राका, डॉ. सोनाली महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif