जनसंवाद,शिक्षण व खेळ एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0

जळगाव ;- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, मुळजी जेठा महाविद्यालय जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 20 मार्च रोजी जनसंवाद,शिक्षण व खेळ या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन राष्टीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत पत्रकारिता, शिक्षण, आणि खेळ या विषयावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शनपर करणार आहेत.
यात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या झी 24 तास या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका हेमाली मोहिते यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत न्यूज 18 चे विशाल पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील डॉ. सोमनाथ वडनेरे, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा येथील प्रा.साहेबराव भूकन, नवी दिल्ली येथील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले कंटेंट रायटर प्रशांत शिरसाळे, पत्रकार विशाल चढा हे आहेत.
या परिषदेेसाठी के.सी.ई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या परिषदेचे समन्वयक म्हणून शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा.डॉ. केतन चौधरी, प्रा. डॉ निलेश जोशी आणि जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदीप अशोक हे जबाबदारी सांभाळत आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.