परभणीत संविधानाची विटंबना, आंदोलनाला हिंसक वळण

तोडफोड करून जाळपोळ (व्हिडीओ)

0

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

परभणीत वातावरण प्रचंड चिघळले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती.  या बंददरम्यान आता हिंसाचार उफाळून आला आहे. यावेळी आक्रमक जमावाने दुकानांवर दगडफेक केली आहे. तसेच जिल्हापरिषद शाळा परिससरात जाळपोळही करण्यात आली आहे. यादरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच दंगलनियंत्रण पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

https://x.com/PTI_News/status/1866758999024222232

मंगळवारी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील प्रतिकात्मक संविधानाच्या प्रतेवरील काच काल फोडण्यात आली होती. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच शहरात अघोषित बंद पाळण्यात आला होता. बुधवारी या घटनेच्या निषेधार्थ शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंदच ठेवली.

दुपारी १२ नंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जमाव जमण्यास सुरुवात झाली होती. हळू हळू जमाव शहरात दगडफेक करत फिरत होता. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशनरोड, गुजरीबाजार, अष्टभुजा देवी चौक, गांधी पार्क, शिवाजी चौक या भागासह जिंतूररोड, वसमत रोड या भागातील वाहनांना टार्गेट करत तोडफोड करण्यात आली.

रस्त्यावर उभी असणारी अनेक वाहने पेटवून देण्यात आली आहेत. काही भागात पोलिसांवर ही दगडफेकीच्या घटना घडल्या. स्टेशनरोडवरील विसावा चौक येथील एक दुकान पेटवून देण्यात आले. दुकानावरील पाट्या फोडण्यात आल्या. यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.