पंतप्रधान आवास योजनेत गैरप्रकार रवींद्र कोळी यांचे लाक्षणिक उपोषण

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;

पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल यादीतील गैरव्यवहाराबाबत रवींद्र पाडुरंग कोळी. रा. विरवाडे, ता.चोपडा जि. जळगाव यांनी आज दि. १२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले.

यूट्यूब लिंक👇

उपोषणकर्ते रवींद्र कोळी म्हणाले कि, पंतप्रधान आवास योजनेत घरकुल यादीत गावातील अनेक बड्या नामवंतांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करत स्वतःला दुसर्या-तिसर्यांदा लाभार्थी यादीत स्थान दिले. मात्र जे खरे लाभार्थी आहेत ते प्रत्यक्षात मात्र वंचित आहेत. त्यांनी ग्रामसेवक, सीईओ व ग्रामपंचायतीतील अनेकांच्या संगनमताने डावलण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी काही पुरावे देखील सादर केले आहे. सदर गैरव्यवहाराचे लेखी निवेदन त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सादर केले. आणि प्रकरणाचा योग्य तो निकाल लावण्याचीही मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.