माजी आमदार पांडुरंग बरोरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात करणार प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जोरदार धक्का !

0

माजी आमदार पांडुरंग बरोरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात करणार प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जोरदार धक्का !

मुंबई | प्रतिनिधी

शहापूर विधानसभेतील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार पांडुरंग महादू बरोरा यांनी अखेर मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. आज दुपारी ३ वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.
त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला असून, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जोरदार धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

२०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आलेले पांडुरंग बरोरा २०१९ मध्ये पराभूत झाले होते. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी घेतली होती, मात्र केवळ १३०० मतांनी पराभव पत्करावा लागला.
या पराभवानंतर त्यांनी राजकीय दिशा बदलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. आजच्या पक्षप्रवेशाने त्यांच्या राजकारणातील पुढील प्रवासाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा हे शहापूरमधून तब्बल चार वेळा आमदार राहिले असून, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे बरोरा कुटुंबाचे शहापूरमधील राजकारणात भक्कम अस्तित्व आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.