पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांकडून उकळले पैसे !

0

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पंढरपूरच्या गोपाळपूर येथील प्रसिद्ध गोपाळपूर कृष्ण मंदिरात दर्शनासाठी पुजारी भाविकांकडून पैसे घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्याने महिला पुजाऱ्याने दर्शनासाठी मंदीसारत प्रवेश नाकारला आहे. या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कार्तिकी एकादशी निमित्ताने भाविक पंढरपुरात येत आहे. कार्तिक यात्रेमुळे पंढरपूमधे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. येथे आलेले भाविक गोपाळपुरात श्रीकृष्ण मंदिरातील संत जनाबाईचा संसार पाहण्यासाठी आवर्जून जातात. परंतु येथे जाणाऱ्या भाविकांकडून याकरिता पैसे आहेत. पैसे घेवून दर्शनासाठी सोडले जात असल्याने देवाच्या दारात स्थानिक पुजाऱ्यानी पैशाचा बाजार मांडल्याने भाविकंमधून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पैसे दिले नाही म्हणून मंदिरात प्रवेश नाकारतात
पंढरपुरात दर्शनासाठी आलेले भाविक गोपाळपूर येतात. मात्र येथे आलेल्या भाविकांकडून जबरदस्तीने पैसे घेतले जातात. पैसे नाही दिले तर चक्क मंदिरात प्रवेश नाकारला जातो. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. असाच एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यापूर्वी असे अनेकदा प्रकार घडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.