Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»आधार आणि  पॅन कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता
    उत्तर महाराष्ट्र

    आधार आणि  पॅन कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 12, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     आधार आणि  पॅन कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता

    केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाकडून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन

    जळगाव प्रतिनिधी

    सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, सातबारा, घरपट्टी किंवा वीज बिल यांसारखी माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका, असा इशारा केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाने दिला आहे.
    विशेषतः काही सेवाभावी कंपन्या किंवा गट तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या पॅन कार्डचा वापर करून GST नोंदणी करू शकतात. त्यामुळे तुमचे नाव अशा प्रकारच्या बोगस व्यवहारांमध्ये अडकण्याची शक्यता आहे.

    जर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला आहे का, हे तपासण्यासाठी gst.gov.in > Search Taxpayer > Search by PAN या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवता येईल.

    फसवणुकीस सामोरे गेल्यास त्वरित तक्रार करा
    जर तुमच्या पॅन कार्डचा वापर करून GST नोंदणी झाली असेल, तर त्वरित केंद्रीय जी.एस.टी. विभागाशी संपर्क साधावा. यासाठी जी.एस.टी. भवन, नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर येथील विभागीय कार्यालये मदत करणार आहेत.

    संपर्कासाठी कार्यालयीन पत्ते आणि क्रमांक:
    नाशिक: 0253-2313299

    जळगाव: 0257-2224844

    धुळे: 02562-270465

    अहमदनगर: 0241-2451342

    जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन
    नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली खासगी कागदपत्रे देऊ नयेत. कोणत्याही शंकेस्पद व्यवहाराची त्वरित तक्रार करावी, असे आवाहन केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

     

    adhar card pan card
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif