Sunday, January 29, 2023

भयंकर.. धावत्या कारमधून चिमुकलीला फेकून महिलेचा विनयभंग

- Advertisement -

पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पालघरमध्ये भयंकर घटना घडली आहे. काही लोकांनी चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केला. यावेळी स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेने कारमधून उडी मारली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात तिच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. आरोपींनी चिमुकलीला चालत्या कारमधून फेकल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेत महिलाही गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेची तक्रार पालघर येथील मांडवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी कार चालक विजय कुशवाहाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला वारंवार आपले म्हणणे बदलत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. महिलेने 3 वेळा आपले म्हणणे बदलले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या घटनास्थळावरील सीसीटीव्हीचीही तपासणी केली जात आहे.

- Advertisement -

काय म्हणाली पीडित महिला ?
पीडितेने पोलिसांना सांगितले की, “मी कारमधून जात होते, तेव्हा माझ्या मागे बसलेला माणूस मला इकडे-तिकडे स्पर्श करत होता. मी विरोध केल्यावर त्याने मुलीला माझ्या हातातून हिसकावून घेतले आणि बाहेर फेकले. तिला वाचवण्यासाठी मी उडी मारली. मला माहीत नाही. तिला कोणी बाहेर फेकले. कारच्या मागे 3 लोक बसले होते, त्यांना मी ओळखत नाही.” अपघातानंतर महिलेला नालासोपारा येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

पालघरमध्ये इकडे-तिकडे जाण्यासाठी कारमधून प्रवास करणे सामान्य आहे. येथील लोक ये-जा करण्यासाठी अशा खासगी गाड्यांमध्ये बसतात. ही महिलाही अशाचप्रकारे कारमध्ये इतर महिलांसोबत बसली होती. नंतर त्या महिला वाटेत उतरल्या आणि पीडिता एकटी राहिली. यावेळी कारमधील इतर पुरुषांनी तिची छेड काढली.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे