दुचाकींची समोरासमोर धडक; चार जण जखमी

0

दुचाकींची समोरासमोर धडक; चार जण जखमी

पाळधी बायपासजवळील घटना

जळगाव | प्रतिनिधी शहराजवळील पाळधी बायपासजवळ मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत चार जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. सर्व जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंप्राळा परिसरातील रहिवाशी असलेले बापुराव  पाटील (वय ५६) हे पत्नी संगीता पाटील (वय ४२) यांच्यासोबत दुचाकीवरून जळगावकडे जात असतांना पाळधी बायपासजवळ समोरून भरधाव येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यामध्ये दुसर्या दुचाकीवरील मध्यप्रदेशातील मगन पुन्या बारेला (वय २५) आणि उपरसिंग बरडे बारेला (वय २२) या दोघांसह दाम्पत्य असे अपघातात चौघेही जखमी झाले असून, मगन बारेला यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या अपघाताची उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.