Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाळधी-तरसोद बायपासची मंत्री द्वयींकडून पाहणी
    जळगाव

    पाळधी-तरसोद बायपासची मंत्री द्वयींकडून पाहणी

    बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह : चौकशीचे आदेश
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 3, 2026No Comments332 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्ह्यातील पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूलाचा भराव मुसळधार पावसामुळे खचल्याच्या घटनेने महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे वाहतूक अद्याप बंद असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. घटनेनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

    पाहणीदरम्यान मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. रस्त्याचा भराव नेमका कशामुळे खचला, पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला होता का, तसेच बांधकामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे का, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती मागविली. विशेष म्हणजे, हा बाह्यवळण महामार्ग नुकताच तयार झाला असून पहिल्याच मोठ्या पावसात त्याचा काही भाग खचल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. महामार्गाच्या कामादरम्यानही काही नागरिक व स्थानिकांकडून विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्या वेळी त्याकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नसल्याची चर्चा आहे. आता प्रत्यक्ष नुकसान समोर आल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

    पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती दिली. चौकशी अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, तसेच महामार्गाची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या पाहणीवेळी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापौर दीपमाला काळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तांत्रिक माहिती सादर करत दुरुस्तीच्या प्रस्तावित उपाययोजनांची माहिती मंत्र्यांना दिली.

    वाहतूक बंद; नागरिकांची गैरसोय

    रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अद्याप बंद असून जड वाहने आणि इतर वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि खर्च वाढत असून स्थानिक नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif