पाळधी येथे माळी समाज बांधवांनी शिंदे सरकारचे मानले आभार
सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा सत्कार
पाळधी, लोकशाही न्युज नेटवर्क
महायुती सरकारच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र अरणला तिर्थक्षेत्राचा “अ” देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच १०० कोटी रुपये विकास निधी देखील उपलब्ध करून दिल्या याबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करत महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सर्व मंत्रिमंडळाचे आभार मानले.
यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष (युवक) नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल माळी, चंदू माळी, दिलीप माळी, नाना माळी, अनिल माळी, योगेश पाटील, योगेश माळी, बंटी माळी, समाधान वाघ यांच्यासह अन्य समाज बांधव उपस्थित होते.