Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»पालकमंत्र्यांची सकारात्मकता दंगल पीडितांचे आंदोलन स्थगित
    संपादकीय

    पालकमंत्र्यांची सकारात्मकता दंगल पीडितांचे आंदोलन स्थगित

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 1, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही संपादकीय लेख 

    ३१ डिसेंबर २०२४ रोजी येथून जवळच असलेल्या पाळधी या गावी काही समाजकंटकांनी केलेल्या दंगलीत एका विशिष्ट समाजाची २३ दुकाने जाळली होती. या २३ पीडितांना शासकीय मदत मिळावी आणि आरोपींना अटक करावी या मागणीसाठी एकता संघटना जळगावच्या सहकार्याने दंगलीतील पीडित २३ दुकानदारांनी २५ जानेवारी २०२५ पासून जळगाव शहरातील जीएस ग्राउंडवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषण आंदोलन सुरू केले होते. काल उपोषणाचा सातवा दिवस होता. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही, तर 3 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आंदोलन केले जाणार होते. तथापि त्या आधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकारात्मकता दाखवून पाळधी दंगलीतील आगग्रस्त पीडितांच्या मागणी संदर्भात एकता संघटनेचे अध्यक्ष फारुख शेख तसेच शिष्टमंडळाशी पाचारण करून चर्चा केली.

    दंगलीतील आगग्रस्त पिडीतांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविले असल्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडे प्रस्ताव सादर होताच स्वतः पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत प्राप्त करण्याचे आश्वासन देऊन ती आर्थिक मदत मंजूर करून घेतली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर पाळधीत दंगल करणारे समाजकंटक जे फरार आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे ही आगग्रस्त पीडितांची दुसरी मागणी होती. ती मागणी सुद्धा पालकमंत्र्यांनी मान्य करून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डींना सूचना केली आणि दंगलखोर आरोपी आरोपींना तातडीने अटक करा.. जे कोणी आरोपी असतील, ते कुणाचेही नातेवाईक असले तरी त्यांची तमा न बाळगता अटक करा… असा आदेशच पालकमंत्र्यांनी दिला.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सकारात्मकता आणि योग्य निर्णय अभिनंदनिय आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आगग्रस्त पीडितांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला. परिणामी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पालकमंत्री या त्रिकुटाच्या निर्णयामुळे उपोषणास बसलेल्या आंदोलकानी आपले आंदोलन स्थगित केले आहे. आंदोलन मागे घेतले नाही, यदाकदाचित आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर पुन्हा ते आगग्रस्त पीडित आंदोलन करतील, असेही शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर आपले मत मांडले .आंदोलनाच्या दोन्ही मागण्या मान्य होणार नाहीत, असे होणार नाही. अशी वेळ सुद्धा आंदोलकांवर येणार नाही. कारण जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री हे सकारात्मक दृष्टीने या आंदोलनाच्या मागण्यांकडे पाहत आहेत.

    पाळधी हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे गाव आहे. त्या गावात एक वर्षांपूर्वीसुद्धा अशाच प्रकारे समाजकंटकांनी दंगल घडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्या पाठोपाठ ३१ डिसेंबर २०२४ ला झालेल्या दंगलीमुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील व्यथित झाले होते. पाळधी गावात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, पाळधीकर गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मनापासून वाटते. म्हणूनच पाळधी दंगलीतील आगग्रस्तांच्या दोन्ही मागण्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी अत्यंत पुढाकाराने घेतल्या हे विशेष होय. त्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अभिनंदन केले पाहिजे. वास्तविक पाळधी हे गुलाबराव पाटलांचे जन्मगाव आहे.

    पाळधीसाठी गुलाबराव पाटलांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे. पाळधी गावातील सर्व समाजाशी त्यांचे अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत. प्रत्येक समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा पाहिजे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुलाबराव पाटलांचा नुकताच झालेला विधानसभा निवडणुकीत चांगल्या मतांनी विजय झाला. तसेच तिसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना मिळाले हे विशेष होय. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळात स्थान निर्माण केले आहे. गुलाबराव पाटलांना जळगाव जिल्ह्याच्या विकासातील आगळे वेगळे स्थान निर्माण करायचे आहे. त्यामुळे कसल्याही बाबतीत खुनशीपणा त्यांच्यात नाही. आगामी पाच वर्षे गुलाबराव पाटलांसाठी कसोटीचे आहेत. या पाच वर्षात जळगाव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा ही अपेक्षा आहे. एकंदरीत पाळधी दंगलीतील आगग्रस्तांच्या मागण्यांसाठी गुलाबराव पाटलांनी जी सकारात्मकता दर्शवली, त्याबद्दल ते अभिनंदनच पात्र आहेत. त्यांच्या या भूमिकेकडे पाळधी गावातील शांतता प्रस्थापित होईल या शंका नाही..!

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Paldhi Dangal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!

    October 12, 2026

    आज दिल्ली जंतर-मंतरवर सीजेपीचा संग्राम गाजणार!

    October 9, 2026

    निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!

    October 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif