पाळधीत संत तुकाराम बीज निमित्त पालखी परिक्रमा
पाळधी ता. धरणगाव येथे पंचक्रोशीतील श्री संत तुकाराम मराठा समाज मंडळातर्फे श्री संत तुकाराम बीज निमित्त पालखी परिक्रमा करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थित पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. काही अंतर पालखी मिरवणुकीत पालकमंत्र्यांनी पालखी खांद्यावर घेतली शोभायात्रेत वारकरी मंडळाच्या विद्यार्थ्यांनी विविध अभंगाचे गायन वादन करून वातावरणात अध्यात्मिक उत्साह भरला
मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ यांच्या वेशभूषेतील वंशिका विशाल महाजन दक्ष संदीप पाटील या चिमुकल्यांनी मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले, पालखी परिक्रमेची सांगता श्री गायत्री शक्ती पिठात संत तुकाराम आरती दोनगाव सरपंच भागवत पाटील डेप्युटी सुरेश पाटील संजय महाजन भगवान मराठे गोपाल सोनवणे आदींच्या हस्ते करण्यात आली सूत्रसंचालन संजय पाटील सर यांनी केले यावेळी महाप्रसादाचे वाटप उपस्थित भाविक भक्तांना करण्यात आले .
रात्री ह भ प विश्वनाथ महाराज वाडेकर यांचे कीर्तनात भाविक भक्त तल्लीन झाले पालखी मिरवणुकीत जि प सदस्य प्रतापराव पाटील अनिल माळी सरपंच शरद कोळी उपसरपंच दिलीप पाटील ग्रामपंचायत सदस्य अनिल कासट धनराज कासट सुनील झंवर कैलास पाटील एन एस पाटील संदीप पाटील रमेश पाटील किरण पाटील श्रीराम पाटील रतिलाल पाटील राकेश पाटील भूषण शिंदे आबा लंके हेमंत पाटील शरद पाटील यासह समाज बांधव ग्रामस्थांनी सहभाग घेतला.