जळगाव शहरातील खोटे नगर पेट्रोल पंप जवळ रस्त्याने पायी चालणाऱ्या चाळीस वर्षे महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तीस हजार रुपये किमतीची 15 ग्राम वजनाची सोन्याची साखळी लांबवून पलायन केल्याचा प्रकार 13 रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला असून याप्रकरणी पोलिसात अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, खोटे नगर परिसरातील दत्त रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या चाळीस वर्षीय सीमा युवराज पाटील या 13 रोजी खोटे नगर ते गुजरात पेट्रोल पंप दरम्यान रात्री साडेनऊ वाजता सुमारास शतपावली करीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील पंधरा ग्राम वजनाची व तीस हजार रुपये किमतीची सोन्याचे चैन तोडून प्रसार झाल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी सीमा पाटील यांनी आरडाओरोड केली मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.