Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»पाकिस्तान हादरले : घाट परिसरात अपघाताचा थरार!
    अपघात

    पाकिस्तान हादरले : घाट परिसरात अपघाताचा थरार!

    प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, 40 जणांचा मृत्यू
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2026No Comments284 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. बलूचिस्तानच्या सीमेवर ही दुर्घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वळणाच्या रस्त्यावर उलटून दरीत कोसळली. ही बस क्वेटाहून इस्लामाबादला जाताना हा अपघात घडला. या घटनेने संपूर्ण पाकिस्तानमध्ये शोककळा पसरली आहे.

    बलूचिस्तान राज्य सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा देत म्हटलं की, बलूचिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सीमेवर बस दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर 8 जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच 6 रुग्णवाहिका, 12 वैद्यकीय कर्मचारी, 10 वाहने घटनास्थळी पोहोचले.

    प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, बस प्रवाशांनी भरलेली होती. बसच्या छतावरही प्रवासी बसले होते. खरंतर बसमध्ये आधी फक्त 36 प्रवासी बसले होते. परंतु खराब रस्त्यावर एका बंद पडलेल्या बसमधील प्रवासी या बसमध्ये येऊन बसले. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये बसल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच शेरानी जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बचाव पथक घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलं.

    पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि बलूचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती संवदेना व्यक्त केली. तसेच त्यांनी प्रशासनाला जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. शेरानीचे उपायुक्त हजरत वली काकर यांनी म्हटलं की, आता जखमींची प्रकृती स्थिर आहे. प्रवाशांचे मृतदेह हे रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले आहेत. आता मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच मृतांची नावे देखील अद्याप समोर आलेली नाही. या भीषण अपघाताने पाकिस्तान, बलूचिस्तानमधील नागरिक शोकसागरात बुडाले आहेत. या अपघातानंतर अनेक जण हळहळ व्यक्त करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026

    आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif